गृहमंत्र्यांवर कोर्टाचे ताशेरे

October 21, 2010 9:05 AM0 commentsViews: 2

21 ऑक्टोबर

राष्ट्रवादीचा फरार नगरसेवक राज्याच्या गृहमंत्र्यांना पोलिसांच्या उपस्थितीत भेटतो आणि त्याला अटक होत नाही, याबाबत कोर्टाने कडक शब्दात आर. आर. पाटील यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

माजी नगरसेवक नासेर चाऊस यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणीचा आरोपी 20 ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथे झालेल्या इफ्तार पार्टीत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत सहभागी झाला होता.

अफसरखानवर अनेक गुन्हे दाखल आहेत. पण महत्वाचे म्हणजे माजी नगरसेवक चाऊस यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अफसरखानला जामीन नाकारण्यात आला आहे.

पण तरीही त्याला अटक करण्यात आली नाही. गृहमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीला अफसरखान उपस्थित असल्याचे फोटो, नासेर चाऊस यांनी कोर्टात सादर केले.

त्यानंतर कोर्टाने गृहमंत्र्यांवर हे ताशेरे ओढले. जानेवारी महिन्यात माजी नगरसेवक नासेर नाहदी चाऊसवर प्राणघातक हल्ला झाला होता.

या प्रकरणात अफसरखान आणि त्याचा भाऊ अलिमखान या दोघांवर गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती.

विशेष म्हणजे जिल्हा कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर अफसरखान 20 ऑगस्ट रोजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या औरंगाबादमधल्या एका इफ्तार पार्टीला हजर राहिला.

हायकोर्टात धाव घेतल्यानंतरही अफसरखानला जामीन मिळाला नाही. मुंबई होयकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानेही जिल्हा कोर्टाचेच निष्कर्ष ग्राह्य धरले.

फिर्यादी असलेले नासेर चाऊस यांनी अफसरखानचे जुगार खेळतानाचे आणि इफ्तरार पार्टीत आर. आर. पाटील अजित पवार यांना भेटतानाचे छायाचित्रासंह पुरावेच सादर केले आहेत.

त्यामुळे आर. आर. पाटील पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

close