गुजारिशचे म्युझिक लाँच

October 21, 2010 12:48 PM0 commentsViews: 1

21 ऑक्टोबर

गुजारिश या सिनेमातून येत्या नोव्हेंबरमध्ये हृतिक आणि ऐश्वर्याची जोडी पुन्हा एकदा आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन अशी दुहेरी बाजू संजय लीला भन्साली यांनी सांभाळली आहे.

या सिनेमात तब्बल 10 गाणी असून नुकतेच मुंबईत मोठ्या जल्लोषात सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले.

यावेळी संगीतकार, गायक, दिग्दर्शक यांच्यासोबतच कलाकारांनीही आपल्या गाण्याने उपस्थितांची मने जिंकली .

close