साईबाबांच्या मंदिर विकासाला विरोध

October 21, 2010 12:55 PM0 commentsViews: 2

21 ऑक्टोबर

साईबाबांनी स्वत: दगडी बांधकाम करवून घेतलेल्या मंदिराला सोन्याने मढवून संस्थान चूक करत असल्याचा आरोप बाबांना मंदिर बांधून देणार्‍या गोपाळराव बुट्टी यांच्या नातवाने केला आहे.

काही काळ बुट्टींना वाड्याचे एक रुपया भाडे दिले जात होते. ते मानाचे भाडेही बंद केल्याने बुट्टी नाराज झाले आहेत.

गोपाळराव बुट्टी हे त्याकाळचे श्रीमंत सावकार होते. तेही सोन्याचे मंदिर बांधून देऊ शकले असते. पण स्वत: साईबाबांना ते नको होते, असे शिर्डीकरांचे म्हणणे आहे.

असेच नवे बांधकाम सुरू राहिले तर साईबाबांच्या काळातील एकही वास्तू राहणार नाही. त्यामुळे गावकर्‍यांनी याला विरोध करायचे ठरवले आहे.