प्रशिक्षण संस्था चालवणार्‍या मांत्रिकाला अटक

October 21, 2010 12:59 PM0 commentsViews: 3

21 ऑक्टोबर

स्वत: मांत्रिक असल्याचे भासवत एका भोंदू बाबाने मांत्रिक बनवण्याची प्रशिक्षण संस्था स्थापन केल्याची धक्कादायक घटना गोंदियात घडली आहे.

याप्रकरणी श्री गुरुदेव कल्याण मंडल नरसिंह आश्रम चालवणार्‍या चौर्‍यासी बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. मध्यप्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील लामटा इथे हा आश्रम आहे. चौर्‍यासी बाबा हा आश्रमाचा सर्वेसर्वा आहे.

आश्रमाला लागून महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया ,मध्यप्रदेशमधला बालाघाट, शिवणी, बदलपूर आणि छत्तीसगडमधल्या राजनंद गाव यांच्या सीमा आहेत. येथील गावकर्‍यांना मांत्रिकाचे प्रमाणपत्र देण्याचे काम हा बाबा करत होता.

पण त्याने प्रमाणपत्र दिलेल्या अनेकांचा अचानक मृत्यू झाल्याने गेली अनेक वर्ष पोलीस या बाबाच्या शोधात होते. पण राजकीय वरदहस्त असल्याने तो पोलिसांच्या ताब्यात येऊ शकला नव्हता. अखेर त्याला अटक झाली आहे.

close