नवीन मराठी शाळांना पुढील वर्षापासून मान्यता

October 21, 2010 1:10 PM0 commentsViews: 5

21 ऑक्टोबर

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन मराठी शाळांना मान्यता दिली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

राज्यात गेल्या सहा वर्षांत मराठी शाळांना मान्यता न दिल्याचा मुद्दा गेले अनेक दिवस गाजत आहेत. आता शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वादावर उत्तर दिले आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत मराठी शाळांसाठीचा बृहद्आराखडा तयार केला जाईल आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन मराठी शाळांना मान्यता दिली जाणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मराठी शाळा सुरू आहेत. पण त्यांना मान्यता दिली नव्हती.

close