आयसीएलमधून संदीप पाटीलला विश्रांती ?

October 29, 2008 11:04 AM0 commentsViews: 5

आयसीएल लॉन्च करताना संदीप पाटील एक आकर्षण ठरला होता. आयसीएलमध्ये त्याच्यावर जबाबदारी होती मुंबई चॅम्प्स टीमची. पण त्याला संधीचं सोनं करता आलं नाही.मुंबई चॅम्प्सच्या खराब फॉर्मनंतर या सिजनसाठी पाटील यांना त्यांच्या कामकाजावरून रजा देण्यात आली. पण सीएनएन आयबीएनशी बोलताना आपली हकालपट्टी झाली नसल्याचं सांगितलं. पहिल्या चार मॅच गमावल्या नंतर आम्हाला लक्ष्यात आलं की मुंबई चॅम्प्स नॉक आऊट फेजसाठी क्वालिफाय होणार नाही. म्हणून मग आम्ही तरुण खेळाडूंना संधी देण्याचा विचार केला. धीरज जाधवला कॅप्टनपदाची जबाबदारी दिली आणि मी आयसीएल बोर्डाला ब्रेक देण्याची विनंती केली होती जी त्यांनी मान्य करण्यात आली. या सिरीजच्या शेवटच्या मॅचसाठी कदाचित मी पुन्हा मुंबई चॅम्प्समध्ये सामील होईन.

close