सोयाबीनची साडेसात हजार पोती पाण्यात

October 22, 2010 10:14 AM0 commentsViews: 1

22 ऑक्टोबर

काल झालेल्या पावसाने नागपूरच्या कळमना मार्केट मधील 10 हजार धान्याची पोती पाण्याने ओली झाली आहेत.

यात सोयाबीन आणि गहू मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीनची साडेसात हजार पोती पाण्यात भिजली आहेत.

गव्हाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.

फक्त मार्केट यार्ड कमिटीच्या गोंधळाच्या कारभारामुळे शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला आहे.आता सोयाबीनला तर नाहीच, पण गव्हालाही भाव मिळणार नाही.

close