तिसर्‍या वन डेसाठी दोन्ही टीम गोव्यात दाखल

October 22, 2010 11:57 AM0 commentsViews: 1

22 ऑक्टोबर

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सीरिजमधली तिसरी आणि शेवटची वन डे येत्या रविवारी गोव्यात होणार आहे.

या मॅचसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम आज गोव्यात दाखल झाल्या आहे. या सीरिजमध्ये भारतीय टीम 1-0 ने आघाडीवर आहे.

विशाखापट्टणमला झालेल्या दुसर्‍या वन डे मध्ये भारताने ऑस्ट्रेलियन टीमचा पाच विकेट राखून पराभव केला होता.

त्यामुळे तिसरी वन डे जिंकून ऑस्ट्रेलियन टीमला ब्राऊन वॉश देण्याचा प्रयत्न भारतीय टीम करेल.

तर निदान तिसरी वन डे जिंकून सीरिजचा शेवट गोड करण्याचा ऑस्ट्रेलियन टीमचा इरादा असेल.

ऑस्ट्रेलियाची बारा जणांची टीम आज गोव्यात आली. कारण डज बॉलिंजर आणि माईक हसी कालच मायदेशी परतले आहे.

close