भारताच्या पहिल्या डावात तीन विकेटवर 296 धावा

October 29, 2008 11:38 AM0 commentsViews: 6

29 ऑक्टोबर,दिल्ली-दिल्ली टेस्टमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली खरी, पण सुरुवातीलाच भारताला दोन जबरदस्त धक्के बसले. पण यानंतर ऑस्ट्रेलियाला तिसरी विकेट मिळवण्यासाठी झगडावं लागलं. गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकरनं मैदानावर चांगलाच जम बसवला. दोघांनी 130 रन्सची दणदणीत पार्टनरशीप करत डाव सावरला. सचिननं आक्रमक बॅटिंग करत टेस्ट करिअरमधली 51वी हाफ सेंच्युरी ठोकली. जॉन्सनचा बाहेर जाणारा बॉल मारण्याच्या प्रयत्नात तेंडुलकरने आपली विकेट गमावली. तेंडुलकरने 68 रन्स काढले. त्यानंतर गंभीरने लक्ष्मणबरोबर चौथ्या विकेटसाठी नाबाद पन्नास रन्सची पार्टनरशीप केली. त्याचबरोबर त्याने टेस्ट मॅचमधली तिसरी आणि या सिरीजमधली दुसरी सेंच्युरी केली.दिवसअखेर भारताने पहिल्या डावात तीन विकेटवर 296 धावा केल्या. गंभीर 149 आणि लक्ष्मण 54 धावावर खेळत आहेत.

close