उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते उतरले

October 22, 2010 1:05 PM0 commentsViews: 10

22 ऑक्टोबर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरवात झाली आहे.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेतेही उतरले आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही महापालिका वॉर्डमध्ये जाहीर सभा घेतली.

कॉग्रेस पक्षाने या निवडणुकीत पहिल्यांदाच 77 वॉर्डात आपले उमेदवार उभे केले आहे.

प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

कोल्हापूरचा विकास करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, आम्ही शहराचे सगळे प्रश्न सोडवू असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदेंनी दिले आहे.

सध्या केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आहे.त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतही काँग्रेसची सत्ता आली तर शहराचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी म्हटले आहे.

close