तुळजाभवानीच्या दर्शनाला लोटला भक्तगण

October 22, 2010 11:50 AM0 commentsViews: 3

22 ऑक्टोबर

सोलापुरात कोजागिरी पोर्णिमेच्या मध्यरात्री आई तुळजाभवानीच्या दर्शनाला सर्वात मोठा छबिना निघतो.

यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातले देवीचे हजारो भक्त तुळजापूरकडे अनवाणी निघाले आहेत.

दस-याचे सीमोल्लंघन झाल्यानंतर निदि्रस्त होणारी तुळजाभवानी, कोजागिरी पोर्णिमेला जागृत होते.

यानिमित्त सोलापुरच्या रूपा भवानी मातेचे दर्शन घेऊन पायी वारी निघाली आहे. या वारीत लहान-मोठ्यांसह विविध मंडळांचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले आहेत.

सोलापूर ते तुळजापूर हे पन्नास किलोमीटरचे अंतर भाविक रात्रभर चालत पार करतात तरीही त्यांना थकवा जाणवत नसल्याचे भाविक म्हणतात.

close