लिव्ह इन रिलेशनशिप निकालात ‘कीप’ या शब्दावर आक्षेप

October 22, 2010 4:58 PM0 commentsViews: 19

22 ऑक्टोबर

लिव्ह इन रिलेशनशिपविषयचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने जी भाषा वापरली आहे. आता त्यावर टीका होत आहे.

निकालपत्रातल्या 'कीप' या शब्दाच्या वापरावर आक्षेप घेण्यात आला आहे.

भारताच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग यांनी न्यायमूर्ती काटजू आणि न्यायमूर्ती ठाकूर यांनी वापरलेल्या 'कीप' या शब्दावर जोरदार टीका केली आहे.

निकाल देताना त्यात स्त्रीत्वाचा अपमान करणारे शब्द वापरू नयेत, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली.

21 व्या शतकात सुप्रीम कोर्टाने असे शब्द वापरणे योग्य नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

close