रेसकोर्सवरच्या कर्मचार्‍यांचा पुण्यात सन्मान

October 24, 2010 11:03 AM0 commentsViews: 1

24 ऑक्टोबर

पुण्यातील हॉर्स रेसिंगचा सिझन संपला आहे. या निमित्ताने एक अनोखा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यात हॉर्स रेसींगला स्वतंत्र उद्योगाचे स्थान प्राप्त करुन देणा-या जॉकी आणि घोड्यांच्या प्रशिक्षकांचा हा सन्मान करण्यात आला.

जॉकी या प्रोफेशन बद्दल सर्वसामान्यांना तशी फारशी माहीती नसते. या जॉकींना कोणताही पगार नसतो.

त्यांच्या कामगिरीवरच त्यांचे उत्पन्न अवलंबून असते. त्यांची कामगिरी ही त्यांच्या घोड्यांच्या कामगिरीवर ठरत असते.

घोड्यांची पैदास ते त्यांची जडणघडण या सगळ्यात या जॉकींचा वाटा सिंहाचा असतो.

त्यांच्या या मेहनतीमुळेच हा खेळ स्पोर्टस ऑफ किंग ऐवजी किंग ऑफ स्पोर्टस म्हणून पुढे येत असतो.

close