ओबामा यांचा भारत दौरा मुंबईपासून सुरू होणार

October 24, 2010 11:29 AM0 commentsViews: 5

24 ऑक्टोबर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत आहेत. ओबामा यांचा भारत दौरा मुंबईपासून सुरू होत आहे.

ओबामा मुंबईत सहा आणि सात नोव्हेंबर असे दोन दिवस राहणार आहेत.

त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मिशेल आणि व्हाईट हाऊसचा भला मोठा कर्मचारी वर्ग असणार आहे.

या सर्व पाहुणचारासाठी मुंबई सज्ज होत आहे.

स्वत: ओबामा हे दहशतवादी हल्ल्याचे लक्ष ठरलेल्या ताज महल हॉटेलमध्ये राहणार आहेत. त्यासाठी ताज हॉटेलचे सर्व 570 रूम आधीच बुक करण्यात आल्ल्यात आहे.

त्याच बरोबर त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी ताज प्रेसिडेंट, ग्रॅण्ड हयात, ओबेरॉय हॉटेल्समध्येही व्यवस्था करण्यात आली.

ओबामांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त असणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा असणार आहे.

ओबामांच्या स्वागतासाठी मुंबई महापालिकेनंही तयारी सुरू केली. त्यांना रस्त्यांतल्या खड्यांचा त्रास होऊ नये म्हणुन खड्डे बुजवण्याचे कामही सुरू करण्यात आलं आहे.

त्यासाठी महापालिकेने पंचवीस लाख रुपयांची व्यवस्थाही केली आहे.

विमानतळ ते कुलाब्यातलं ताज महल हॉटेल, तसेच ओबामा भेट देणार असलेल्या ठिकाणांकडे, जाणारे सर्व रस्त्यांची डागडुजी करणे आणि डिवायडर्स रंगवण्याचे काम सुरू असल्याच महापालिकेने सांगितले आहे.

close