सुहास खामकरचं जंगी स्वागत

October 24, 2010 11:55 AM0 commentsViews: 5

24 ऑक्टोबर

बहारीनला झालेल्या अशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला तेरा वर्षानंतर सुवर्ण पदक मिळवून देणार्‍या सुहास खामकरचे कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात आले.

कोल्हापुरातील दसरा चौकात कोल्हापूरकर आणि महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेतर्फे हा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता.

त्यानंतर शहरातल्या विविध भागातून शिवाजी चौकापर्यंत सुहासची मिरवणूक काढण्यात आली.

close