भारताचे तिरंदाजीचे नॅशनल कोच लेनिन यांचा अपघातात मृत्यू

October 24, 2010 12:13 PM0 commentsViews: 1

24 ऑक्टोबर

भारताचे तिरंदाजीचे नॅशनल कोच लेनिन यांचा हैद्राबादमध्ये अपघातात मृत्यू झाला.

कॉमनवेल्थमध्ये मेडल जिंकलेले खेळाडू आणि त्यांच्या कोचचा जाहीर सत्कार काल रात्री आंध्रप्रदेश सरकारने केला.

या कार्यक्रमानंतर लेनिन विजयवाडाला घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.

लेनिन यांच्यासोबत जिग्नेश आणि रितुल चटर्जी हे तिरंदाजही होते.

दोघांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले होते. दोघांना किरकोळ जखमा झाल्यात. आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कोच लेनिन मात्र अपघातात जागीच ठार झाले.

close