गोवा वन डे रद्द : भारताने सीरिज जिंकली

October 24, 2010 12:45 PM0 commentsViews: 1

24 ऑक्टोबर

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची तिसरी वन डे अखेर पावसामुळे रद्‌द करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय टीमने ही सीरिज 1-0 ने जिंकली.

मागचे दोन दिवस गोव्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आज मैदान ओलसर होते. खासकरुन आऊटफिल्ड निसरडे झाले होते.

अंपायरनी सकाळपासून दोनदा मैदानाचे आणि पिचचे परीक्षण केले. आणि अखेर सव्वा बारा वाजता मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

तीन मॅचच्या या सीरिजमध्ये पावसामुळे दोन मॅच वाहून गेल्या. विशाखापट्टणम इथली दुसरी वन डे ठरल्याप्रमाणे झाली.

आणि ही टेस्ट 5 विकेट राखून जिंकत भारताने सीरिज जिंकली.

त्यामुळे टेस्टपाठोपाठ वन डे सीरिजही खिशात घालण्याचा पराक्रम भारतीय टीमने केला.

close