अबू सालेम आजमगढमधून लोकसभेची निवडणूक लढवणार

October 29, 2008 1:46 PM0 commentsViews: 49

दिनांक 29 ऑक्टोबर, मुंबई – लोकसभा निवडणुकीचे वेध सगळयांनाच लागलेत. गँगस्टर अबू सालेमही लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशातून तो निवडणूक लढवणार आहे. अबू सालेमची ओळख म्हणजे एक खतरनाक गँगस्टर. पण त्याला आता इतर गँगस्टरसारखी नेता बनण्याची स्वप्न पडू लागली आहेत. त्याला नगरसेवक, आमदार बनायचं नाही तर थेट खासदार बनायचंय. सालेमनं उत्तर प्रदेशातल्या आजमगढमधून लोकसभेची निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय. आजमगढ हा जिल्हा उत्तर प्रदेशातला एक मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मुस्लीम समाज मोठ्या संख्येनं आहे. आजमगढमध्ये आबू सालेम हा पॉप्युलर आहे.काही दिवसांपूर्वी सालेमच्या समर्थनार्थ हजारो आजमगढवासियांनी मोर्चा काढला होता.यामुळे या मतदार संघातून त्याला तिकिट देण्यास उत्तर प्रदेशातील अनेक पक्ष तयार आहेत, असं म्हटलं जातं. सालेम सध्या मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.तरीही त्याची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी त्याला त्याचा अ‍ॅडव्होकेट भाचा राशिद अन्सारीची मदत मिळतेय. सालेमला एक अडचण आहे ती म्हणजे तो त्या मतदार संघाचा मतदार नाही. पण त्यासाठी त्यानं लखनौ हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी होणं बाकी आहे.

close