आर.आर.पाटील यांच्या ब्लॉगमध्ये मंत्रालयातील कारभाराचा गौप्यस्फोट

October 24, 2010 11:02 AM0 commentsViews: 5

24 ऑक्टोबर

गडचिरोलीतल्या नक्षली हल्ल्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आबांना धारेवर धरले याचे शल्य आबांच्या मनातून अजुनही गेलेले नाही.

बैठकीतली माहिती लिक करून गुप्ततेचा भंग करणार्‍या सहकारी मंत्र्याचा पत्रकार म्हणून आबांनी उल्लेख केल्यानंतर सगळीकडेच हा पत्रकार मंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

त्यातचआता आबांच्या नवीन ब्लॉगवरून नवं वादळ होण्याची शक्यता आहे. फेसबुकवर लिहिलेल्या ब्लॉगवर आर.आर.पाटील यांनी मंत्रालयातील कारभाराबाबत गौप्यस्फोट केला आहे.

यात आर. आर. पाटील म्हणतायत की, मंत्रालयात बिल्डर्सना थेट प्रवेश दिला जातो, उद्योजकांना पायघड्या घातल्या जातात.

पण सामान्य माणसांची मात्र उपेक्षा होते. गडचिरोलीतल्या लोकांना गोळी नको, त्यांना हवी भाकरी आणि चांगलं प्रशासन. या व्यवस्थेचा मीही एक भाग आहे.

नक्षलवाद हा फक्त कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर तो सामाजिक आणि आर्थिक प्रश्नही आहे. विकासाचा मार्ग जोपर्यंत आदिवासींपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत हा प्रश्न संपणार नाही.

नक्षलवादाचे उत्तर गोळीत नाही तर मंत्रालयाच्या सहाही मजल्यांमध्ये शोधावे लागेल.

close