ठाण्यात परतीच्या पावसाने भाताच्या पिकाचे मोठे नुकसान

October 24, 2010 1:14 PM0 commentsViews: 3

24 ऑक्टोबर

आठ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत आहे.

जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात यामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले.

यावर्षी भाताचे पिक चांगल्या पद्धतीने आले होते मात्र पाऊस लांबल्याने कापणीसाठी तयार झालेले पीक शेतात भिजत आहे.

त्यातच पंचायत समितीतून मिळालेले मंगला जातीचा भात सांगितलेल्या कार्यकाळाच्या अगोदर पिकल्याने शेतकर्‍यांच्या धावपळीत आणखीणंच भर पडली आहे.

या बद्दल शेतकर्‍यांनी पंचायत समितीत तक्रार दाखल केली आहे.

close