यंग ब्रिगेड मैदानात

October 24, 2010 4:01 PM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर

कोल्हापूर महानगपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला चागंलाच रंग चढला आहे. या निवडणुकीत बहुतांश तरुण वर्ग मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

त्यामुळे प्रत्येक पक्षाने यंग ब्रिगेडला प्रचारात उतरवले आहे. काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना प्रचारात उतरवून प्रचारातआघाडी घेतली.

तर यंग बिग्रेड या युवा राजकारणाची संकल्पना देशभर रुजविलेल्या कॉग्रेसच्या राहुल गांधीचे शिलेदार या निवडणुक रिंगणात प्रचारासाठी उतरणार आहेत.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आमदार अमित देशमुख यांची प्रचारसभा होणार आहे.

महसूलमंत्री नारायण राणे यांचा मुलगा खासदार निलेश राणे काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमध्ये आहेत.

खासदार प्रिया दत्त यांचाही रोड शो घेण्यासाठी कॉग्रेसपक्षाने तयारी केली.

close