बिहारमध्ये 52 टक्के मतदान

October 24, 2010 5:27 PM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर

बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातल्या 45 जागांसाठी मतदान पार पडले. दिवसअखेर 52 टक्के मतदानाची नोंद झाली.

पूर्व चंपारणमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 58 टक्के मतदान झाले. काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्या.

यात सीतामढी जिल्ह्यातल्या रुन्नी सैदपूर भागामध्ये तीन पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

या भागातल्या एस.पींनी या पोलीस अधिकार्‍यांचे अपहरण झाल्याची शक्यता नाकारली.

45 पैकी 6 जिल्ह्यात म्हणजे शिवहर, समस्तीपूर, दरभंगा, सीतामढी मुजफ्फरपूर, आणि पूर्व चंपारणच्या काही भागांमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 ठेवली होती.

close