पाडगावकरांवर भाजपची टिका

October 24, 2010 5:33 PM0 commentsViews:

24 ऑक्टोबर

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राने नेमलेले काश्मीर मध्यस्थ दलच आता वादात सापडलं आहे.

काश्मीर प्रश्न पाकिस्तानच्या सहभागाने सोडवावा लागेल या काश्मीर मध्यस्त दलाचे नेते दिलीप पाडगावकर यांच्या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे.

1947 पासून पाकिस्तानचा जम्मू-काश्मीरशी संबंध आहे. कोणी हे समजत असेल की पाकशी चर्चा केल्याशिवाय परिस्थिती सुधारेल तर ते चूक आहे.

शांती स्थापन करण्यासाठी पाकशी बातचित आवश्यक आहे असे विधान पाडगावकर यांनी केले आहे.

भाजपने पंतप्रधानांकडे या विधानाचे स्पष्टीकरण मागितले आहे.

या मध्यस्थ दलाला कोणते निर्देश देऊन काश्मीर घाटीत पाठवलंआणि पाकिस्तानच्या संदर्भात जे विधान मध्यस्त दलाने केले ते पंतप्रधान कार्यालयाच्या सहमतीने केले का याचही स्पष्टीकरण भाजपने मागितले आहे.

close