राणें-भुजबळांचा सेनेवर प्रहार

October 24, 2010 5:35 PM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर

आज रविवार असल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला.

सगळ्याच पक्षांनी आज रॅली, रोड शो, भाषणांचा सिलसिला सुरू केला.

आघाडीने कल्याणमध्ये आज संयुक्त सभा घेतली.

ही सभा गाजली ती नारायण राणेंच्या भाषणामुळे या निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेल्या राणेंनी शिवसेनेवर एकामागून एक प्रहार केले.

शिवसेनेवर टीका करतानाच त्यांनी युवासेनेला लक्ष्य करत युवासेनेनंतर पुढच्या वर्षी बालसेनाही येणार असा टोला लावला.

यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही शिवसेनाप्रमुखांवर टीकास्त्र सोडताना आता मतदार भावनेला बळी पडणार नसल्याच म्हटल आहे.

close