आंदोलनामुळे कांदा लिलाव ठप्प

October 25, 2010 10:15 AM0 commentsViews: 3

25 ऑक्टोबर

माथाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी व्यापार्‍यांनी केलेल्या बंदनंतर तडजोड बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यात कबूल केल्याप्रमाणे व्यापार्‍यांनी लेव्ही भरली नसल्याने माथाडींनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

गेल्या दोन वर्षात बाजारसमिती बंद होण्याची ही सहावी वेळ आहे. याचा फटका शेतकरी आणि ग्राहकांना बसत आहे.

आता लाल कांदा बाजारात येण्याची वेळ असताना बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

औरंगाबाद, नागपुरात परिणाम नाही

राज्यभरात माथाडी कामगारांचा संप सुरू असला तरी औरंगाबादमध्ये या संपाचा कोणताही परिणाम नाही.

औरंगाबादमध्ये कामगार संपावर नसल्यामुळे इतर ठिकाणच्या पालेभाज्या शहरात येत आहेत.

त्यामुळे औरंगाबादेत पालेभाज्या नेहमीच्याच दरात मिळत आहेत. भेंडी, गवार आणि बटाट्यांच्या किंमतीत काहीशी वाढ झाली आहे.

पण त्याचा या संपाशी कोणताही संबंध नाही. औरंगाबाद शहरातील भाजीबाजारात माथाडी कामगारांचा संप नाही.

उलट भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत.

औरंगपुरा, मुकुंदवाडी भागातील भाजी बाजारांमध्ये नेहमीप्रमाणेच भाजीपाल्याची विक्री होत आहे.

माथाडी कामगारांच्या संपाचा नागपूरच्या बाजारपेठेवरही कोणताही परिणाम दिसून आला नाही.

कामगार संपावर नसल्यानं भाजीपाल्यांची आवक सुरु आहे. त्यामुळं भाजीपाला नेहमीच्या दरात मिळत आहे.

काही भाजीगाल्यांचे दर वाढलेत. पण त्याचा या संपाशी संबंध नाही.

close