आजपासून सभांची रणधुमाळी

October 25, 2010 10:24 AM0 commentsViews: 1

25 ऑक्टोबर

काल प्रचाराच्या शेवटच्या रविवारी सर्वच पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याची संधी साधली.

आता आजपासून जाहीर सभांच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

आज डोंबिवलीतील भागशाळा मैदानावर राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा होत आहे.

रोड शो आणि बैठकांनंतर सर्वच पक्षांच्या जाहीर सभांनी हा आठवडा गाजणार आहे.

बाळासाहेब ठाकरेसुध्दा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

आघाडीचेही सर्व प्रमुख नेतेही जाहीर सभा गाजवताना बघायला मिळतील.

दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी राजवर जोरदार टीका केली होती.

या टीकेला राज काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close