माणिकराव-चतुर्वेदींची हायकमांडकडून दखल

October 25, 2010 10:27 AM0 commentsViews: 1

25 ऑक्टोबर

माणिकराव-चतुर्वेदी संभाषण प्रकरणाची दखल अखेर, काँग्रेस हायकमांडने घेतली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या काँग्रेस महासमितीच्या सदस्यांमधून सतिश चतुर्वेदी यांचे नाव वगळण्यात आले आहे.

या महासमितीवरुन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवरील डेलिगेटस म्हणून महाराष्ट्रातून 62 जणांची निवड झाली आहे.

त्यामध्ये राज्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

यामध्ये माणिकराव ठाकरेंचा समावेश करण्यात आला असला तरी, सतीश चतुर्वेदी यांना वगळण्यात आले आहे.

त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरुन माणिकरावांची गच्छंती जवळजवळ निश्चित झाल्याची जोरदार चर्चा पक्षामध्ये रंगली आहे.

close