भांडूप इथल्या कारखान्यातल्या मुलांनी काढल्या रांगोळया

October 29, 2008 2:17 PM0 commentsViews: 149

दिनांक 29ऑक्टोबर, भांडूप- भांडूप दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात दिसणा-या संस्कार भारतीच्या रांगोळ्या सगळ्याचंच लक्ष वेधून घेतात. अशाच रात्रीच्या दिव्यात दिवाळीनिमित्त संस्कारित रांगोळ्या रेखाटण्याचं काम भांडूपमधली तरुण मंडळी करत आहेत. भांडूपमधल्या टेबल लँप बनवणा-या कारखान्यात हे तरुण काम करतात. दिवसभर काम करणा-या तरुणांच्या हातून इथे साकारल्या आहेत मनमोहक रांगोळया. संस्कार भारतीच्या कुशीत वाढलेल्या ह्या तरुणांना जपलंय ते ही संस्कारांनीच. रांगोळी काढणं हा आता केवळ स्त्रियांच्या कौशल्याचा भाग राहिला नाही. सुबक रांगोळीवर कलागुण साकारण्यात मुलंही मागे नाहीत हेच या तरुणांनी सिद्ध केलंय

close