संमेलनासाठी सरकारी पैसा घेण्यात गैर काय?

October 25, 2010 10:33 AM0 commentsViews:

25 ऑक्टोबर

साहित्यसंमेलनासाठी सरकारचा पैसा घेण्यात गैर काय आहे? असा सवाल ठाण्यातील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केला आहे.

सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा असतो, त्यामुळे तो घेण्यात गैर नाही असेही ते म्हणाले.

राजकीय नेत्यांना साहित्यासाठी अस्पृश्य का समजण्यात येते ते चूक आहे.

याच भूमिकेमुळे मराठीत राजकीय कादंबर्‍या आल्या नाहीत.

राजकारणी आणि साहित्यिक यांची मैत्री असण्यात गैर काय, मात्र त्यात विवेकबिंदू असावा असेही ते म्हणाले.

close