नागपुरातील मंदिरांमधील चोर्‍या सुरूच

October 25, 2010 10:41 AM0 commentsViews: 4

25 ऑक्टोबर

नागपूर शहरातील मंदिरांमधून चोर्‍यांचा सिलसिला सुरूच आहे.

नागपूरच्या महाल भागातील आयचित मंदिर नावाने प्रसिध्द असलेल्या बालाजीच्या मंदिरातून सात लाखांची चोरी झाली आहे.

यामध्ये 12 किलो चांदी, एक सोन्याचे टिळापत्र, 1 चांदीचे सिंहासन, 2 चांदीच्या समया, 2 चांदीचे राजदंड, 1 चांदीची छत्री तसेच 1 अष्टदंड यांचा समावेश आहे.

चार दिवसांपूर्वीच वर्धा रोडवरच्या गजानन महाराज मंदिरात साडेचार लाखाची चोरी झाली होती.

त्या आधी जैन मंदिरातूनही लाखांची चोरी झाली होती. त्यामुळे नागपुरातील मंदिरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

close