कीर्तनकाराकडे खंडणी मागणार्‍यास अटक

October 25, 2010 10:56 AM0 commentsViews: 2

25 ऑक्टोबर

औरंगाबादमध्ये एका कीर्तनकाराकडे दोन लाखांची खंडणी मागणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे.

कीर्तनकार ताजोद्दीनबाबा यांच्याकडे ही खंडणी मागण्यात आली आहे.

या प्रकरणी विश्वजितकुमारसिंह, गिरीश उर्फ राहुल सोळंकी आणि सचिन भांडेकर या तिघांना पोलिसांनी दोन रिव्हॉल्व्हरसह अटक केली आहे.

त्यांच्याकडून पंधरा जिवंत काडतुसे आणि चाकूही औरंगाबादच्या गुन्हे शाखेने जप्त केला.

close