मनसेचा वचकनामा जाहीर

October 27, 2010 10:27 AM0 commentsViews: 2

27 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा वचकनामा जाहीर केला आहे. या वचकनाम्यात 12 वचनं आहेत.

पूर्ण सत्ता द्या, शहराचा पूर्ण विकास करून दाखवू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

माझ्याकडे शहर विकासाचे मिशन आहे आणि मनसेकडे शहर विकासाचे व्हिजन आहे.

त्यामध्ये सगळ्यांना सामावून घेणार, असंही राज यांनी सांगितले आहे.

सत्तेवर आल्यास स्वत: आठवड्यातून तीन ते चार दिवस इथे येऊन काम करीन आणि करून घेईन असंही ते म्हणाले.

वचकनाम्यात 12 वचन

1.रस्त्याचे काँक्रीटीकरण करणार

2. पाणी पुरवठा सुरळीत करणार

3. घंटागाडी सुरु करणार

4. अनधिकृत बांधकामांचा समाचार घेणार

5. ग्रंथालय उभारुन 1 लाख पुस्तक ठेवणार

6. गोदा पार्कसारखा प्रकल्प उभारणार

7. शहरातली हॉस्पिटल व्यवस्था सुधारणार

8. बोगस लायसन्स व रेशन कार्डवर तातडीने उपाययोजना करणार

9.शहराची वाहतूक व्यवस्था जास्त गतिमान आणि कार्यक्षम करणार

10. उघडी गटारं आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेवर तातडीने उपाय करणार

11.अधिकृत मार्गाने राहणार्‍या नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी कालबाह्य कार्यक्रम राबवणार

12. गेल्या 15 वर्षांत लावली नाहीत इतकी झाडं येत्या पाच वर्षांत लावणार

शाहरुखची जाहिरात सेनेच्या मुखपत्रात कशी ?

शाहरुखच्या माय नेम इज खान या चित्रपटाला विरोध करताना शिवसैनिकांना पोलिसांनी बडवले होते.

त्याच शाहरुखची जाहिरात शिवसेनेच्या मुखपत्रात कशी काय छापता.

असा सवाल राज ठाकरे यांनी शिवसेनेला केला.

close