माथाडींच्या संपाचा शेतकर्‍यांना फटका

October 27, 2010 11:37 AM0 commentsViews: 2

27 ऑक्टोबर

माथाडी कामगारांचा संप एका दिवसात मिटला पण या एका दिवसाच्या संपाचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे.

पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावमधल्या कृषी उत्पादक समितीमध्ये कोथिंबीरीच्या सव्वा लाख जुड्या पडून होत्या.

जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातून ही कोथिंबीर येते.

माथाडी कामगारांच्या संपामुळे मंगळवारी आलेली ही कोथिंबीर बुधवारपर्यंत उचललीच गेली नाही.

शहराच्या बाजारपेठेत याच जुडीला 10 ते 20 रूपये असा भाव मिळतो.

पण इथे मात्र ही कोथिंबीर पूर्णपणे सडली आणि शेळ्या मेंढ्यांसाठी ती मेजवानीच ठरली.

तर उरलेली कोथिंबीर अक्षरश: कचर्‍यात फेकून द्यावी लागली.

त्यामुळे शेतकर्‍यांना हे पाहण्याशिवाय पर्यायच उरला नाही.

close