ऊसतोड कामगारांची दिवाळी

October 27, 2010 11:40 AM0 commentsViews: 7

27 ऑक्टोबर

राज्यात यावर्षी जोरदार ऊस उत्पादन झाले आहे. त्यामुळे राज्यातले ऊसतोड कामगार यावर्षी उसतोडीला राज्याबाहेर जाणार नाही.

त्यातच ऊसतोडीसाठी 23 टक्के दरवाढ मिळाल्याने कामगार खूश आहेत.

बीड जिल्ह्यातून यंदा सव्वा लाख ऊसतोड कामगार बाहेर पडले आहे.

तर अहमदनगर जिल्ह्यातल्या एकट्या पाथर्डी तालुक्यातून तब्बल 40,000 ऊसतोड कामगार तोडीसाठी बाहेर पडले आहे.

पूर्वी बैलगाडीने कामगार जायचे, पण आता ट्रॅक्टर आणि ट्रकने जाण्याच प्रमाण वाढले आहे.

कारखान्याचे गाळप सुरु होईल, तसे बीड भागातून तब्बल 3 लाख, तर पाथर्डी- शेवगाव तालुक्यांतून 1 लाखावंर कामगार ऊसतोडीसाठी बाहेर पडतील.

close