बाजार समिती तोडफोड प्रकरणी पोलिसांना तात्काऴ निलंबित करा

October 27, 2010 11:48 AM0 commentsViews: 5

27 ऑक्टोबर

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी काल तोडफोड केली होती.

या घटनेत शेतकर्‍यांवर आणि पत्रकारांवर लाठीचार्ज केलेल्या वाशिमच्या पोलिसांना तात्काऴ निलंबित करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपेकर यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.

सोयाबीनचा खरेदी दर 2000 ते 2001 रुपये असतांना, वाशीम बाजार समितीती व्यापार्‍यांकडून 1500 ते 1600 दराने खरेदी करणे सुरु होते.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी बाजार समिती कार्यालयाची तोडफोड करुन कागदपत्राची होळी केली.

कार्यालयातून सामान बाहेर काढून होळी करण्यात आली होती.शेतकर्‍यांनी पोलिसांच्या चार गाड्यांवर हल्ला केला आणि गाड्यांची तोडफोड केली.

यावेळी आएबीएन लोकमतचे रिपोर्टर मनोज जैस्वाल यांनाही पोलिसांनी मारहाण केली होती आणि त्यांचा कॅमेराही हिसकावला होता.

तसेच त्यांच्याकडचे 25 हजार रुपयेही हिसकावले. तहसीलदार आणि अधिकार्‍यांसमोर ही मारहाण झाली होती.

close