पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांचा 73 वा वाढदिवस जल्लोषात साजरा

October 27, 2010 12:06 PM0 commentsViews: 3

27 ऑक्टोबर

पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांचा 73 वा वाढदिवस षण्डमुखानंद हॉलमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

ह्रदयेश आर्टस् या संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे एका सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबर असे सलग दोन दिवस हा स्वरोत्सव रंगणार आहे.

ह्रदयनाथ मंगेशकर यांचा वाढदिवस आणि लता मंगेशकर यांचे सहस्त्रपूर्णचंद्र दर्शन या दोन्ही गोष्टींचा सुवर्ण मेळ घालत या ह्रदयेश फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ह्रदयनाथ मंगेशकरयांना शुभेच्छा द्यायला लता मंगेशकर , उषा मंगेशकर यांच्या सोबत संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते.

close