मुलीला कचरा कुंडीत फेक णार्‍या आईवर खुनाचा गुन्हा दाखल

October 27, 2010 12:16 PM0 commentsViews: 6

27 ऑक्टोबर

स्वतःच्या जुळ्या मुलांपैकी नवजात मुलीला कचर्‍याच्या पेटीत फेकून देणार्‍या आईवर आज खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेचे नाव दिपिका परमार असे असून ती 28 वर्षांची आहे.

दहिसरची रहिवासी असलेल्या दिपिकाने काल आपल्या मुलीला वॉर्डच्या प्रसाधनगृहाच्या खिडकीतून फेकून दिले होते.

त्यानंतर तासाभराने त्या बाळाला बाहेर काढण्यात आले. पण बाहेर काढल्यानंतर लगेचच त्या बाळाचा मृत्यू झाला.

दरम्यान, दिपिकाने खोटा दावा करत आपले बाळ हरवल्याची तक्रार केली होती.

हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने सीसीटीव्ही फूटेज तपासले. पण सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिनेच बाळ फेकून दिल्याचे स्पष्ट झाले.

दीपिकाने दीड महिन्यांपूर्वीच जुळ्याला जन्म दिलायया जुळ्यांना श्वसन विकाराचा त्रास होता.

त्यांच्या उपचाराचा खर्च पेलणार नाही, म्हणून दीपिकाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

दिपिका सध्या आपल्या दुसर्‍या मुलासोबत हॉस्पिटलमध्येच आहे.

डॉक्टरांशी सल्लामसलत करुन तिला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

close