पाणी प्रश्नावर महिलांची गांधीगिरी

October 27, 2010 1:26 PM0 commentsViews: 6

27 ऑक्टोबर

पाणी प्रश्नावर राजकारण होत असताना दुसरीकडे कोल्हापूरमध्ये नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणार्‍या महिलांना धक्काबुक्की करण्यात आली होती.

अशी धक्काबुक्की करणार्‍या पोलीस आणि अधिकार्‍याचा आज गांधीगिरी करत निषेध करण्यात आला.

संतप्त महिलांनी महानगरपालिकेचीच आरती केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोरच हे आंदोलन महिलांनी केले.

कालच, कोल्हापूर महानगरपालीकेचे आयुक्त विजय सिंघल यांना महिलांनी धारेवर धरले होते.

पाणीपुरवठा कार्यालयात घुसून काल महिलांनी हे आंदोलन केले होते.

close