पेप्सी नको पाणी द्या !

October 27, 2010 1:31 PM0 commentsViews: 7

27 ऑक्टोबर

मुंबईत यंदा चांगला पाऊस झाला असला तरी शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्याचा प्रश्न सतावत आहे.

देवनार इथं पांजरापोळ भागात नागरिकांना पाण्याचा प्रश्न सतावत आहे.

याविरोधात आज नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांसह पेप्सीच्या बाटल्या फोडत आंदोलन केले.

लोकांना पेप्सी नव्हे पाणी हव आहे, अशी घोषणाबाजी ही यावेळी करण्यात आली.

महानगरपालिका इथल्या खाजगी कंपन्यांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करते. पण सर्वसामान्य लोकांना पाणीटंचाईला सामोर जाव लागते.

त्यामुळे खाजगी कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 15 एमएलडी कपात करुन सर्वसामान्यांना पुरेल एवढा 125 MLD पाणीपुरवठा केला जावा.

या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले. महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि सत्ताधारी पक्षांना मोठ्या प्रमाणात हफ्ता मिळत असल्याने ती खाजगी कंपन्यांचं हित जोपासत आहेत असा आरोप नबाव मलिक यांनी केला आहे.

यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांच पुर्नवसन केले जाते पण त्याच प्रमाणात पाणी पुरवठा केला जात नसल्याचे स्थानिकांच म्हणणे आहे.

close