मंत्र्यांची मालमत्ता जाहीर होणार

October 27, 2010 4:43 PM0 commentsViews: 3

27 ऑक्टोबर

मंत्रिमंडळाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने पावलं उचलली आहेत.

कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर यांनी याबाबत केंद्रातल्या सर्व मंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे.

आणि आपली मालमत्ता आणि जबाबदार्‍या जाहीर करण्याची सूचना केली आहे.

31 ऑगस्ट 2011 पर्यंत मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशील द्यावा, अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाने केली आहे.

मंत्र्यांची मालमत्ता होणार

- मंत्र्यांच्या मालमत्तेचा तपशील पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे

- यापुढे प्रत्येक वर्षी मंत्र्यांना त्यांची मालमत्ता जाहीर करावी लागणार आहे

- यापूर्वी फक्त माहितीच्या अधिकाराखालीच मंत्र्यांच्या मालमत्तेचा तपशील मिळू शकत होता

close