अणूउर्जा प्रकल्पाच्या विरोधात जेलभरो आंदोलन

October 29, 2010 10:11 AM0 commentsViews: 7

29 ऑक्टोबर

जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज ग्रामस्थांनी जेलभरो आंदोलन केले आहे.

माडबन, निवेली, करेल, मीठगवाणे भागातले शेकडो ग्रामस्थ प्रकल्पाला विरो़ध दर्शवण्यासाठी माडबन गावात जमा झाले.

या पार्श्वभूमीवर माडबनमध्ये 500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी न्यायमूर्ती पी. बी सावंत आणि माजी नौदल प्रमुख के. रामदॉस यांना पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापूर्वीच अटक केली आहे.

तर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील जिल्हाबंदी असल्याने आंदोलन स्थळी पोहचू शकले नाहीत.

close