ठाकरे विरुध्द ठाकरे युध्द सुरुच

October 27, 2010 5:37 PM0 commentsViews: 3

27 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निमित्ताने ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा झाली.

आपल्या सभेत राज यांनी शिवसेनेवर पुन्हा हल्ला चढवला. बाळासाहेबांनी केलेले आरोप खोडून काढण्याचा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला.

माझा आत्मविश्वास हाच माझा अनुभव आहे. शिवसेनेकडे सांगण्यासाठी नवीन काहीही नाही असे राज म्हणाले.

बाळासाहेबांबद्दल बोलाल तर खबरदार, उद्धव ठाकरेंचा इशारा

उध्दवठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे आणि नारायण राणे यांचा समाचार घेतला.

आपल्यावर काहीही टीका करा. पण बाळासाहेबांविरुध्द काही बोललात तर याद राखा, असा इशारा उद्धव यांनी दिला.

युतीच्या संयुक्त सभेत शेवटी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची सीडी दाखवण्यात आली.

close