गरोदर महिलेला मुलासह जाळले

October 30, 2010 1:00 PM0 commentsViews: 35

30 ऑक्टोबर

नगरमधील नेवासे तालुक्यातील आळी चिंचोरा इथे एका 26 वर्षांच्या गर्भवती महिलेला तिच्या नवर्‍यानेच रॉकेल टाकून जाळल्याची घटना घडली आहे.

सुमैय्या असे या दुर्देवी महिलेचे नाव आहे. तिला पेटवून दिल्यानंतर तिच्या 2 वर्षांच्या चिमुरड्यालाही तिच्या अंगावर फेकून देण्यात आले. यात या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला.

तर 8 महिन्यांची गर्भवती असलेली सुमैया 95 टक्के भाजली. माहेरहून पैसे आणावेत यासाठी निसार या नराधमाने हे भयानक कृत्य केले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली. तर दुदैर्वी सुमैय्या मृत्यूशी झुंज देत आहे.

close