काठोडा प्रकरणी दोघांना जन्मठेप

October 30, 2010 1:13 PM0 commentsViews: 1

30 ऑक्टोबर

बीडमधील काठोडा दरोडा आणि बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेप आणि आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तर इतर दोन आरोपींना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या आरोपींचा दयेचा अर्ज करण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला आहे.

बीडच्या प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी.दिग्रजकर यांनी ही शिक्षा सुनावली. 2008 साली बीडमध्ये एकनाथ तिष्टक यांच्या घरी दरोडा टाकून त्यांची हत्या करण्यात आली होती.

तसेच अल्पवयीन मुलीवर बलात्कारही करण्यात आला होता. त्याबाबत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

close