मातीच्या पणत्यांना स्पर्धा चिनी पणत्यांची

October 30, 2010 1:21 PM0 commentsViews: 1

30 ऑक्टोबर

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आणि या सणातला पहिला मान मिळतो तो मातीच्या पणत्यांना…

पण सध्या पीओपी आणि चिनी मातीच्या पणत्यांमुळे मातीच्या पणत्या मागे पडत आहेत. आणि हीच पणत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाटण गावातील कुंभारवाड्याची खंत आहे.

पाटणमधील बहुतेक घरांत पिढ्यानपिढ्या मातीच्या पणत्या बनवल्या जातात. पण सध्या त्यांना स्पर्धा करावी लागत आहे, ती पीओपीच्या आणि चिनी मातीच्या पणत्यांशी…

सध्या राजस्थानातील प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि चिनी मातीच्या पणत्यांमुळे त्यांच्या धंद्यावर परिणाम होत आहे, अशी खंत या कुंभारांनी व्यक्त केली आहे.

close