रायगडमध्ये विचित्र तापाच्या साथीने 13 मृत्यू

October 28, 2010 10:43 AM0 commentsViews: 3

28 ऑक्टोबर

रायगड जिल्ह्यातल्या शिहू परिसरात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळून आले आहे.

आतापर्यंत विचित्र तापाच्या साथीने या परिसरात 13 जणांचा मृत्यू झाला. तर 24 जणांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यामुळे या सगळ्यांचे रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

त्यातले सहा जणांचे नमुने लेप्टोस्पायरसिस पॉझिटीव्ह आलेत.

पेण तालुक्यातील शिहू चाळे, जांभळ टेप आणि झेतिर-पाडा या परिसरात सध्या ही विचित्र तापाची साथ पसरली आहे.

या परिसरात यापुर्वी 36 मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत.

आता या तापामुळे रुग्णाच्या छातीत दुखणे, अंग दुखणे, डोके दुखणे, चक्कर येणे आणि रक्ताच्या उलट्या होणे या सारख्या तक्रारी निर्माण होतात.

योग्य वेळेस उपचार न केल्यास रुग्ण मृत्युमुखी पडतात.

या गावांतील लोकांच्या तपासणीसाठी ठाण्याहुन आरोग्य विभागाच्या पथकाने या रुग्णांची तपासणी केली आणि हा लॅप्टो पॅरॅसीस असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याबाबतचा रिपोर्ट उद्या कळणार आहे.

close