नवे मुख्यमंत्री दिवाळीपूर्वी

October 31, 2010 9:32 AM0 commentsViews: 2

31 ऑक्टोबर

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमध्ये,नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरु झाला आहे.

आयबीएन-लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांची गच्छन्ती निश्चित समजली जात आहे.

त्यामुळे आता नवा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे.

सध्या तरी काँग्रेसमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावरुन संभ्रम आहे.

विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळातच आदर्श सोसायटीला मंजूरी देण्यात आली होती.

अशी माहिती पुढे येते आहे. त्यामुळे या दोघांची नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जरा मागे पडल्याची चर्चा आहे.

पण आयबीएन-लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे.

नवा मुख्यमंत्री कोण ?

पृथ्वीराज चव्हाणमुकुल वासनिकसुशीलकुमार शिंदेविलासराव देशमुखनारायण राणे

close