देशभरातील चाळीस विमानतळ विनापरवाना

October 28, 2010 11:10 AM0 commentsViews: 6

28 ऑक्टोबर

देशभरातील चाळीस विमानतळाकडे एअरक्राफ्ट कायद्याप्रमाणे अधिकृत परवाना नाही.

अशी धक्कादायक माहिती नागपूर विमानतळाच्या सुनावणी दरम्यान कोर्टापुढे आली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या सर्व विमानतळांकडे विमान उतरवण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

परवाना मिळवायला जून 2011 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

याबाबत विमानतळ प्राधिकरणाची बाजू मांडणारे राम परसोडकर यांनी ही माहितीआएबीएन लोकमतला दिली.

close