सुशीलकुमार शिंदेंनी दिली अंतिम मंजुरी

October 31, 2010 10:20 AM0 commentsViews: 16

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात आता धक्कादायक बाब पुढे येते आहे. महाराष्ट्राच्या चार माजी मुख्यमंत्र्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

आदर्श सोसायटीला अंतिम परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आणि माजी मुख्यमंत्री आणि तत्कलिन महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी दिली होती.

अशी फिरली फाईल

1) विलासराव देशमुख- मुख्यमंत्री असताना पर्यावरण आणि इतर गोष्टींना मंजुरी दिली- उत्तम घाकरे, किरण भंडगे, अमोल करभाणींच्या नावांची शिफारस

2) नारायण राणे- 1999 ला मुख्यमंत्री असताना याप्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले- गिरीश मेहता, रुपाली रावराणेंच्या नावांची शिफारस

3) सुशिलकुमार शिंदे- मुख्यमंत्री असताना 9 जुलै 2004 साली 'आदर्श'च्या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली- मेजर खानकोजे यांची शिफारस

4) शिवाजीराव निलंगेकर- महसूलमंत्री असताना 9 जुलै 2004 साली 'आदर्श' जागेची परवानगी बहाल केली- संपत खिडसे, अरुण ढवळे यांची शिफारस

5) अजित पवार, जलसंपदा मंत्री- कृष्णा भेगडे, शिवाजीराव कधे यांची शिफारस

6) आर. आर. पाटील, गृहमंत्री- चंद्रशेखर गायकवाड यांची शिफारस

7) पतंगराव कदम, वनमंत्री- बाळासाहेब सावंत यांची शिफारस

8) अनिल देशमुख, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री- मुकुंदराव मानकर यांची शिफारस

9) अशोक चव्हाण, मुख्यमंत्री- सासूबाई दिवंगत भगवती शर्मा, मेव्हणी सीमा विनोद शर्मा आणि मेव्हणी जगदीश शर्मा यांची शिफारस

प्रवास 'आदर्श' फाईलचा

1) 21 सप्टेंबर 1999'आदर्श' सोसायटीच्या परवानगीचे निवेदने मुख्यमंत्री नारायण राणेंना मिळालेराणेंचा शेरा – 'लक्ष घालावे'

2) 7 फेब्रुवारी 2000राणेंकडे आलेले निवेदन पुन्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या दरबारीविलासरावांचा शेरा – 'तातडीने प्रस्ताव सादर करावा'

3) 12 मे 2000मुंबई जिल्हाधिकार्‍यांचा सरकारला अहवाल सादर फाईल पुन्हा विलासरावांकडे

4) 2 जून 2000'आदर्श' फाईलमध्ये पहिल्यांदा आला कारगिलचा उल्लेखत्याचवेळी अशोक चव्हाणांनी दिली हेतू पत्राला मान्यता.अशोक चव्हाणांचा शेरा…कृपया विचार करा आणि फाईल प्राधान्याने सादर करा.

5) 10 एप्रिल 2002नगरविकास खात्याने रस्त्याची रुंदी 60 मीटरवरुन 18 मीटर केली3824 चौरस फूट जागा 'आदर्श'ला उपलब्ध

6) 16 जानेवारी 2003मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी फाईल क्लिअर केलीत्यावर महसूलमंत्री म्हणून अशोक चव्हाणांची ही सही

7) 17 जानेवारी 2003विलासराव देशमुखांचे मुख्यमंत्रीपद गेले

8) 9 जुलै 2004मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि महसूल मंत्री शिवाजीराव निलंगेकरांनी अंतिम मंजुरी दिली

9) 24 ऑगस्ट 2004मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदेंनी वाढीव 51 सदस्यांना मंजुरी दिली

10) 5 ऑगस्ट 2005मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी बेस्टचा एफएसआय वापरण्याची परवानगी दिली

11) 23 सप्टेंबर 2005'आदर्श'च्या फाईलीचा प्रवास संपला

close