राज ठाकरेंची आज डोंबिवलीत सभा

October 28, 2010 11:24 AM0 commentsViews: 1

28 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात आता राज आणि उद्धव असा उघड उघड सामना रंगत चालला आहे.

त्यातच काल उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच थेट टीका केली.

त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे उद्धव यांच्यावर काय पलटवार करतात, याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच्या टीकेबाबत राज एक पाऊल मागे सरकले होते.

मात्र उद्धव यांच्या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देतील हाच आजच्या सभेबद्दलच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

close